उकळणारा चहा ते खदखदणारा देश

My Coverstory on Narendra Modi in Saptahik Vivek –


final-copy

“कुठल्या प्रश्नाला किती आच द्यायची, याचा आडाखा त्यांच्या मनात सदैव तयार असतो. एखाद्या प्रश्नाला उकळी कधी फुटणार, हे जणू त्यांना पक्कं ठाऊक असतं. कुठला विषय किती धगधगत ठेवायचा, याची त्यांना नेमकी जाण आहे. आपल्या एखाद्या वाक्याने किंवा कृतीने हवा तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं भान त्यांच्याजवळ आहे आणि एखाद्या कसलेल्या फलंदाजाप्रमाणे अचूक टायमिंगही साधण्याचं कौशल्य त्यांच्यात आहे. त्यांचा आत्मविश्वास इतका भक्कम आहे की, एखादा फटका मारल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, या खात्रीने ते त्याच्याकडे शांत नजरेने बघत असतात. एखादी धाव चोरण्याची त्यांना फारशी गरजही वाटत नाही.”


 

उकळणारा चहा ते खदखदणारा देश‘मोदी ऍक्ट्स ऍंड अदर्स रिऍक्ट’ असं ख्यातनाम पत्रकार एम.जे. अकबर यांनी म्हटलं होतं. त्यामुळे एका अर्थाने मोदींच्या विरोधकांनीच त्यांना चर्चेचा केंद्रबिंदू बनवलं आहे. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीमुळे या केंद्रबिंदूभोवती आता एक वेगळंच वलय निर्माण झालंय.


लहानपणी तो मोठया भावाबरोबर चहाच्या दुकानात काम करत असायचा. कुठलीही गोष्ट एकाग्रतेने करायची त्याला सवय. चहाच्या आधणाला आच किती द्यायची, हे त्याला अनुभवानेच शिकवलं होतं. पातेल्यातल्या पाण्याला उकळी कधी फुटेल, याचा त्याला अचूक अंदाज असायचा. हे पाणी किती वेळ

1333564340_narendra-modiउकळत राहू द्यायचं, याचं अचूक गणित त्याने मनात ठरवलेलं असायचं. चहाची चव कशी जमलीय ते पिणाऱ्याच्या चेहऱ्यावरून तो ताडून पाहायचा. चेहऱ्यावरच्या या रेषांवरून समोरच्याच्या मनात काय आहे, याचा अचूक अंदाज बांधायची सवय त्याला लहानपणापासून लागली होती.

त्या मुलाचं नाव आहे नरेंद्र दामोदरदास मोदी. गुजरातमधल्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेला हा मुलगा. पाच भावांत मधला. परिस्थितीचे चटके सहन करतच तो मोठा झाला. कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी मोठया भावाबरोबर चहाच्या दुकानात काम करून तो वडिलांना हातभार लावायचा. कदाचित या व्यवसायामुळेच लोकांमध्ये सतत राहण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची सवय त्याला जडली असावी. संपर्कात असलेल्यांचे चेहरे वाचण्याचं कसब त्याने त्याच वेळी साधलं असावं.

थोडा मोठा झालेला नरेंद्र गुजरात परिवहन कॉर्पोरेशनच्या उपाहारगृहामध्ये काम करायला लागला. थोडया वेगळया पातळीवरचं हे काम होतं. गिऱ्हाइकांची संख्या वाढलेली. तिथे येणाऱ्या गाडयांच्या वेळापत्रकाशी त्याला गरमगरम चहाचं वेळापत्रक जुळवावं लागे. गिऱ्हाईकाला गरम चहा तर मिळेलच, पण चहा वायाही जाणार नाही, ही कसरत त्याला सांभाळावी लागे. नियोजनाचा मूलमंत्र त्याला इथेच शिकायला मिळाला असावा.narender-modi-10

घरची स्थिती बेताचीच. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आधी ठरवून, खूप विचारपूर्वक करावी लागे. त्याबरोबर केव्हा काय करायला हवं, याचं व्यवहारज्ञानही त्याला बाळगावं लागे. यातूनच काटकसरीची, विचारपूर्वक निर्णय घेण्याची आणि त्या निर्णयासाठी अचूक वेळ साधण्याची कला त्याला अवगत झाली असावी.

किशोरवयात नरेंद्र संघाच्या संपर्कात आला आणि या सगळया गोष्टींना ‘निर्धार’ या नव्या गुणाची चौकट मिळाली. गरिबीमुळे हा ‘निर्धार’ अधिक पक्का बनला. अगदी ताठरपणाशी जवळीक साधणारा.

वसंतराव गजेंद्रगडकरांसारख्या संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याने नरेंद्रमधली चमक ओळखली. महाराष्ट्रातल्या वसंतराव भागवतांना जसे महाजन-मुंडे गवसले, तसे या वसंतरावांना नरेंद्र मोदी. ‘देश प्रथम’ या पायावर स्वार्थरहित कामासाठी मनाची जडणघडण सुरू झाली.

एका निवडणुकीत त्या वेळच्या जनसंघाचा उमदेवार निश्चित झाला व जाहीरही झाला, पण त्या वेळी कार्यकर्त्यांना वेगळाच उमेदवार हवा होता. त्यांनी गजेंद्रगडकरांच्या भावाचा आग्रह धरला. उमेदवार बदलणं गजेंद्रगडकरांना फारसं अशक्य नव्हतं, पण त्यांनी भावाचा विचार न करता जुनाच उमेदवार कायम ठेवला. ‘पक्षाचा निर्णय अंतिम’ हा विचार मनात रुजलाच, त्याच वेळी देश आणि पक्ष

यांच्यासमोर कुटुंब गौण मानायची मनाची धारणाही पक्की बनली. गुजरातचे सलग तीन वेळा मुख्यमंत्री झालेल्या मोदींचे भाऊ कुणी निवृत्त शिक्षक, कुणी कारकून, कुणी आरोग्यसेवक असं सर्वसामान्य जीवन आज जगत आहेत. मोदींवर त्यांच्या विरोधकांनी अनेक आरोप केले, पण त्यांनी आपल्या कुटुंबीयांचं उखळ पांढरं केल्याचा किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी राजकारणात वा कारभारात ढवळाढवळ केल्याचा आरोप कधी झाला नाही. मोदींचा भाऊ किंवा बहीण, काका किंवा पुतण्या राजकारणात आला नाही.

modi (2)देशासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून नरेंद्रने वयाच्या सतराव्या वर्षी घर सोडलं आणि मग सुरू झाली ती देशभर अखंड भ्रमंती. माणसं शोधणं, माणसं ओळखणं आणि माणसं जोडणं हेच त्याचं जीवनकार्य बनलं. गोळवलकर गुरुजींच्या प्रेरणेने त्याला विरक्ती शिकवली, तर दीनदयाळ उपाध्यायांच्या प्रेरणेतून सर्वसामान्यांच्या उन्नतीचं आणि शेवटच्या घटकाला लाभ मिळवून देणारं अर्थशास्त्र त्याला शिकायला मिळालं. बाळासाहेब देवरसांकडे पाहून अखंड कष्टांची मनाची तयारी झाली, तर अटलबिहारी वाजपेयींच्या सहवासामुळे मनातलं काव्य आणि वाणीतलं वक्तृत्व सहजपणे फुलत गेलं.

वसंतराव गजेंद्रगडकरांचं निधन झालं, तेव्हा त्यांना श्रध्दांजली वाहताना मोदी सहजच म्हणाले, ”श्याम होनेसे पहलेही सूरज ढल गया।” मोदींच्या मनाचे धागे कुठेतरी वाजपेयींशी जुळल्याचं उपस्थितांना जाणवलं.

”काहीतरी बनण्यापेक्षा काहीतरी करण्याचा मी सतत विचार करतो” असं मोदी म्हणत असतात. त्यामुळे आजही सगळे जण त्यांच्याविषयी मुक्तपणे हवं ते बोलत असताना मोदी मात्र दर वेळेस काहीतरी नवं करत असतात. त्यांची कृती थेट लोकांना भिडणारी असते. प्रत्येक पाऊल विचारान्ती टाकायचं आणि पुढे टाकलेलं पाऊल मागे घ्यायचं नाही, ही लहानपणापासूनची सवय आजही त्यांच्या प्रत्येक हालचालीत दिसते.

कुठल्या प्रश्नाला किती आच द्यायची, याचा आडाखा त्यांच्या मनात सदैव तयार असतो. एखाद्या प्रश्नाला उकळी कधी फुटणार, हे जणू त्यांना पक्कं ठाऊक असतं. कुठला विषय किती धगधगत ठेवायचा, याची त्यांना नेमकी जाण आहे. ‘मौत का सौदागर’सारख्या आरोपांनी विचलित न होण्याइतका ठामपणा त्यांच्यात आहे. उलट आरोप करणाऱ्यावरच ते उलटवण्याचं राजकीय कौशल्यही त्यांच्यात आहे.

आपल्या भाषेचा आणि आरोपांचा मोदीच अधिक फायदा घेतात, हे आरोप करणाऱ्यांना नेहमी जाणवत असेल. त्यामुळेच मोदींवर टीका करण्यापूर्वी आधी आपली परवानगी घ्यावी, असला आदेश राहुल गांधी यांना काढावा लागला असेल. काँग्रेसच्या चिल्लर सरदारांना फारसं महत्त्व न देता थेट सोनिया गांधी किंवा मनमोहन सिंग यांना लक्ष्य करून ‘मुळावरच घाव घातला तर फांद्या आपोआप कोसळतील’ ही थोरल्या बाजीरावांची नीती त्यांच्यात आहे. शरद पवार किंवा ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्यांना न दुखावण्याची वाजपेयींची शैली त्यांनी आत्मसात केलीय. ”तुम्हारे लिए तुम्हारी माँ ही सारा देश है। लेकिन हमारे लिये ये देशही हमारी माँ हैं।” अशा काव्यमय शब्दांत राहुल यांच्यावर निशाणा साधण्याचं कौशल्य त्यांच्यात आहे.narendra-modi-06


आपल्या एखाद्या वाक्याने किंवा कृतीने हवा तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं भान त्यांच्याजवळ आहे आणि एखाद्या कसलेल्या फलंदाजाप्रमाणे अचूक टायमिंगही साधण्याचं कौशल्य त्यांच्यात आहे. त्यांचा आत्मविश्वास इतका भक्कम आहे की, एखादा फटका मारल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, या खात्रीने ते त्याच्याकडे शांत नजरेने बघत असतात. एखादी धाव चोरण्याची त्यांना फारशी गरजही वाटत नाही.


‘मोदी ऍक्ट्स ऍंड अदर्स रिऍक्ट’ असं ख्यातनाम पत्रकार एम.जे. अकबर यांनी म्हटलं होतं. त्यामुळे एका अर्थाने मोदींच्या विरोधकांनीच त्यांना चर्चेचा केंद्रबिंदू बनवलं आहे. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीमुळे या केंद्रबिंदूभोवती आता एक वेगळंच वलय निर्माण झालंय.


मार्केटिंगमधले ख्यातनाम उद्योगपती अलेक पदमसी यांनी एकदा म्हटलं होतं, ”कुठलाही यशस्वी उद्योजक स्वत:चा ब्रँड कधी बदलत नाही. तो स्पर्धकांना आपला ब्रँड बदलायला लावतो.” नरेंद्र मोदींनी आजतरी अगदी असंच केलंय.


मोदींचा ब्रँड तोच आहे. विरोधक आता आपापल्या ब्रँडचा फेरविचार करताहेत.


Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s